महत्वाच्या बातम्या

 हुडूकदुमा येथील पूल तुटल्यामुळे विद्यार्थी व गावकऱ्यांचे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : मुख्यालयापासून अंदाजे १२ कि.मी. अंतरावर असलेल्या हूडूकदुमा नजीक असलेला पूल तुटल्यामुळे गावकऱ्यांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. १० ते १२ शाळकरी विद्यार्थी याच मार्गाने येजा करीत असल्यामुळे त्यांना सुद्धा शिक्षणासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कधी पण मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच हूडकदूमा वाशीयांना कार्यालयीन कामे व बाजारपेठेत जाण्याकरीता हा मार्गच एकमेव पर्याय असल्यामुळे नागरिकांनी मार्ग क्रमन करावे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य व गावकऱ्यांची सुरक्षा बघता तातडीने या पुलाचे युद्ध पातळीवर कार्य करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या तर्फे करण्यात येत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos