धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र आष्टी येथे सतीश पवार गडचिरोली यांची सदिच्छा भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी : येथील भारतीय खेळ प्राधिकरण द्वारा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र तथा राज्य सरकारच्या मान्यतेनुसार खेलो इंडिया अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राला सतीश पवार गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल संघटना सचिव तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना, लायन्स क्लब गडचिरोली जिल्याचे उपाध्यक्ष यांनी भेट दिले. तसेच खेळाडूंना थोडक्यात मार्गदर्शन केले व आर्थिक मदत देखील करू, असे सांगितले. यावेळी मा. ज्योतिबा फुले महाविद्यालयचे प्राचार्य संजय फुलझेले, प्राचार्य शैलेन्द्र खराती, धनुर्विद्या प्रशिक्षक प्रा. श्याम कोरडे, ताहीर शेख पोलिस विभाग गडचिरोली, अमित शेंडे विद्युत विभाग आष्टी, शबीर शेख, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुशील अवसरमोल यांनी केले. तर आभार अरविंद वनकर याने मानले.
News - Gadchiroli