पुण्यात आणखी ५ पोलिसांना कोरोनाची लागण : पोलीस दलात खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे :
 महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  कोरोनाशी लढा देण्यासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे. पुण्यात आज आणखी ५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
पुण्यात जीवाची बाजी लावून कर्तृव्यावर असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पुण्यात आज आणखी ५ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.  पुणे पोलीस दलात आतापर्यंत ८ जण कोरोनाबाधित झाले आहे. या ८ ही पोलिसांच्या संपर्कात आलेले १०० हुन अधिक  पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
पुण्यात पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आल्यानंतर  पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्या महिला पोलीस कर्मचारी गर्भवती आहे, त्यांना कोणत्याही बंदोबस्तात ड्युटी देण्यात येणार नाही.
तसेच, खबरदारी म्हणून  ज्या पोलिसांना आधीपासून कोणते आजार किंवा व्याधी असतील अशा पोलिसांनी नाकाबंदीची ड्युटीवर पाठवले जाणार नाही.
दरम्यान, महाराष्ट्रात २७ एप्रिलपर्यंत तब्बल १०७ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात २० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत २ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ७  पोलिसांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.  Print


News - Rajy | Posted : 2020-04-28


Related Photos