महत्वाच्या बातम्या

 लोकशाही वाचवा, अराजकता हटवा विराट पदयात्रेत नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोळकर यांचा उत्स्फूर्त सहभाग!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि संविधानाच्या नावाखाली जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून लोकशाही व्यवस्थेबाबत गैरसमज व अराजकता पसरविणाऱ्या प्रवृत्तींना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टी, मित्रपक्ष आणि देशप्रेमी नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही वाचवा, अराजकता हटवा या विराट पदयात्रेत नगराध्यक्ष ॲड. सौ. प्रणोती सागर निंबोळकर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

लोकशाही मूल्यांचे रक्षण, संविधानाबाबत जनजागृती आणि देशातील लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेप्रती नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

या पदयात्रेत सहभागी झाल्यानंतर नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकशाही मूल्यांचे जतन आणि लोकशाही व्यवस्थेच्या बळकटीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या सहभागामुळे या पदयात्रेला स्थानिक पातळीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले





  Print






Related Photos