कोनसरीच्या जंगलात १० हजार रुपयांचे सागवान लट्ठे केले जप्त, दोघांना केली अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  आष्टी :
कोंनसरी एफडीसीएमच्या गोपनीय माहितीच्या आधारे १६ एप्रिल २०२० ला सकाळी साडेदहा ते अकरा वाजताच्या दरम्यान कक्ष क्रमांक १६९ येथे जाऊन पाहणी केली असता सदर जागेवर सागवानाचे लठ्ठे आढळून आले. आरोपी सोनु इन्‍द्रपाल कावडे (३२) रा. कोनसरी, शंकर इन्‍द्रपाल कावडे (३६) रा. कोनसरी या दोघांनी मिळून सागवानाचे लठ्ठे कापून ठेवले असता या दोघांना अटक करण्यात आली. सदर कार्यवाही कोनसरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. जी. करडभुजे यांच्या मार्गदर्शनात कोनसरीचे क्षेत्र सहायक एस. एम. कोडेवार, वनरक्षक ए. के. खिस्ते व कर्मचाऱ्यांनी केली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सागवानाचे लठ्ठे मिळून आले. या प्रकरणी दोन आरोपींवर दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला व त्या दोन्ही आरोपींना सोडण्यात आले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-17


Related Photos