महत्वाच्या बातम्या

 वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट लावून घेण्याचे आवाहन


- नियमांचे पालन न केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत वेळोवेळी सूचना देऊनही काही वाहनांवर अद्याप  नंबर प्लेट बसविण्यात आलेली नाही.

त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळांमधील अधिकारी व कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) लवकरात लवकर बसवून घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.

HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांशी संबंधित कोणतेही कामकाज उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा येथे करण्यात येणार नाही, याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे यांनी केले आहे.





  Print






Related Photos