महत्वाच्या बातम्या

 पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने शांतता रॅली संपन्न


- २ हजार पेक्षा जास्त नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हयातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवून बळजबरीने पीएलजीए सप्ताह पाळावयाला भाग पाडणाऱ्या नक्षलवाद्यांविरोधात  पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, एटापल्लीच्या वतीने ०६ डिसेंबर २०२२ ला शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले.

सदर शांतता रॅली ही सकाळी ९.३० ला उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालयापासून शहीद चौक, शिवाजी चौक, बुद्ध विहार, इंदीरा गांधी चौक या मार्गाने निघाली. या रॅलीकरिता नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता गावातील प्रतीष्टित नागरिक, शालेय मुले, महिला तसेच इतर विभागाचे अधिकारी/कर्मचारी असे दोन हजारपेक्षा जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदविले. सदर रॅलीला अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे सुरुवात केले व संपूर्ण रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदविले. रॅलीदरम्यान सर्व सहभागी नागरिकांनी बुद्धविहार चौकात संविधानाचे वाचन केले, तसेच रॅलीदरम्यान चौकाचौकात वक्तृत्व स्पर्धा, देशभक्तीपर गीत, नृत्य कार्यक्रम व इतर विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी नागरिकांनी काळ्याफिती लावून तसेच नक्षलविरोधी पॉम्प्लेट्स, पोस्टर्स व बॅनर्स लावून नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाचा निषेध केला. रॅली दरम्यान नागरिकांकडून विविध प्रकारच्या नक्षलवाद विरोधी घोषणा देण्यात आले. दुपारी १.३० ला परत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय एटापल्ली या ठिकाणी सदर शांतता रॅलीचे सांगता करण्यात आले तसेच वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन, नृत्य स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.

सदर रॅली पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यतीश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आले.

सदर शांतता रॅलीच्या यशस्वीतेकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील अधिकारी व अंमलदार, प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन एटापल्ली विजयानंद पाटील, पो.नि. मंदार पुरी, पो.उप.नि. ज्ञानेश्वर धनगर, पो.उप.नि. परमेश्वर गरकल, पो.उप.नि. सविता काळे, पो.उप.नि. अश्विनी नागरगोजे व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos