भामरागड तालुक्यातील ताडगाव जि. प. शाळा तसेच मुख्यालयतील भगवंतराव आश्रम शाळेला अभिजीत दिपके यांची भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : सि. जे. पी. संस्थेचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्याचा दुसरा दिवस भामरागड तालुक्यातील जि प शाळा ताडगाव येथे भेट दिले भेटीदरम्यान शाळांमधील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांच्या समस्यांची पाहणी करण्यात आले.
भेटीदरम्यान शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, वर्गखोलीत विज नाही फॅन ची व्यवस्था नाही जीर्ण झालेले इमारतीत विध्यार्थीना बसवून शिक्षक शिकवत विदयार्थ्यांना जीवनाशी खेळ चालू आहे का?काही घटना घडल्यास प्रशासन ला जाग येईल का? असा प्रश्न उपस्थिती करत यावेळी यांच्या तोडगा लवकरात लवकर काढा अशे गटशिक्षणाधिकारी यांच्याशी फोनवर संवाद साधण्यात आला. जर प्रशासन लक्ष देत नसेल तर गावकारी आणि पालक वर्ग एकत्र येऊन आंदोलन करावे असेही यावेळी दिपके यांनी गावाकराशी बोलले.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन शाळा इमारती बांधण्यात याव्यात, अशी चर्चा यावेळी करण्यात आली.
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी शाळांमध्ये पाणी, सुरक्षित इमारत आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. शाळा भेटीदरम्यान शिक्षक, विद्यार्थी तसेच ताडगाव स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आले.
त्यानंतर अभिजित दिपके यांनी तालुक्यातील मुख्यालय भगवंतराव आश्रमशाळेला भेट दिली. या भेटीदरम्यान शाळेतील आणि वसतिगृहातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी पुरेसे बेड उपलब्ध नसल्याची, शौचालयांच्या सुविधांमध्ये त्रुटी असल्याची माहिती समोर आले. तसेच विद्यार्थ्यांनी दिवसातून फक्त एकदाच पाणी मिळत असल्याची आणि रात्री पाण्याची सुविधा नसल्याची तक्रारही यावेळी विदयार्थ्यांना दीपके यांना केले.
आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, स्वच्छ पाणी, शौचालये आणि शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.




Petrol Price




