गडचिरोली येथे शस्त्रक्रिया करून पोटातून काढला दीड किलो खर्रा


- खर्रा खाणाऱ्यांनो सावधान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली येथे शस्त्रक्रिया करून पोटातून तब्बल दीड किलोचा खर्रा बाहेर काढण्यात आला आहे. त्यामुळे खर्रा खाणारयांनी आता सावधानगी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. बंदी असली तरीदेखील खर्रा व गुटखा खाणारयांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. खऱ्यातील सुपारी व इतर घटक पोटात विरघळत नसल्याने अनेक शारीरिक विकार उद्भवत असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे. एका व्यक्तीला खर्रा खाण्याचे व्यसन होते. खऱ्यातील सुपारी व इतर घटक पोटात न विरघळल्यामुळे त्याचा गोळा तयार झाला होता. त्यामुळे संपूर्ण पचनक्रिया बंद पडली होती. परिणामी त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. येथील एका डाॅक्टराने व्याधीग्रस्त व्यक्तीच्या पोटाची शस्त्रक्रिया केली असता त्याच्या पोटात तब्बल दीड किलो वजनाचा खऱ्यातील सुपारी व इतर घटक असल्याचे दिसून आले असता तब्बल दीड किलो वजनाचे खरयातील सुपारी व इतर घटक बाहेर काढले. त्यामुळे आता खरा शौकिनांनी सावधानगी बाळगावी व खर्रा सेवनापासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-05


Related Photos