हिंगणघाटमध्ये शिक्षिकेला जाळणाऱ्या आरोपीला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
जिल्ह्यातील  हिंगणघाटमध्ये तरुण शिक्षिकेला जाळणारा आरोपी विकेश नगराळे याला अटक करण्यात आली आहे. तर हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातुन शिक्षिकेला पेटवल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज हिंगणघाट बंदची हाक देण्यात आली आहे. 
हिंगणघाट शहरात नागरिकांचा मोर्चा सुरु झाला असून यामध्ये विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे पीडित मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. हिंगणघाटमधल्या तरुणामध्ये या घटनेबाबत संतापाची लाट पसरलीय. 
यात ही ३० वर्षीय शिक्षिका ४० टक्के भाजली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपजिल्हा रुग्णालयातून नागपूरकडे रवाना करण्यात आले होते.  Print


News - Wardha | Posted : 2020-02-04


Related Photos