बग्गूजी ताडाम प्रकरणातील आणखी चार आरोपींना अटक व न्यायालयीन सुटका


- माजी आमदार आनंदराव गेडाम अद्यापही फरारच 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
विधानसभा निवडणूक मध्ये अपक्ष उमेदवार बग्गूजी ताडाम यांच्या अपहरणा प्रकरणी  १२ जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी ७ आरोपीना अटक करण्यात आले होती, तर ५ आरोपी फरार होते.
चार महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर काल सोमवार ३ फेब्रुवारीला  सकाळच्या सुमारास आरोपी  माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, दत्तू सोमनकर, जयंत हरडे, गिरिधर तीतराम यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन स्वतः अटक करवून घेतली अशी माहिती आहे.  पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन वर सोडण्यात आले.  १२ पैकी ११ आरोपींना अटक करण्यात आली असून १ आरोपी माजी आमदार आनंदराव गेडाम अद्यापही फरारच आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-04


Related Photos