पुन्हा एकदा जामिया विद्यापीठात गोळीबार : अज्ञात व्यक्तींविरूद्ध एफआयआर दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
दोन दिवसांपूर्वीच जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चादरम्यान एका तरुणाने केलेल्या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा जामिया विद्यापीठात गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नसून. विद्यापीठाच्या गेट क्रमांक ५वर गोळीबार करण्यात आला आहे.
गोळीबाराची घटना घडल्यानंतर आंदोलकांनी गेट क्रमांक ५ च्या बाहेर गर्दी केली. जामियानगर पोलिस ठाण्याच्या बाहेर देखील घटनेचा निषेध करत आंदोलक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर जमले होते.
दिल्लीत नागरिकत्व कायदा विरोधी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेली गोळीबाराची तिसरी घटना आहे. गुरुवारी रामभक्त गोपाल असे नाव सांगणाऱ्या इसमाने निदर्शकांवर गोळी चालवली होती. त्यात एक विद्यार्थी जखमी झाला होता. तर, शनिवारी शाहीन बाग परिसरात कपिल गुर्जर नावाच्या इसमाने गोळीबार केला होता. या घटनांनंतर दिल्लीतील कायदा-सुव्यवस्थेवरून पोलिसांवर टीका झाली होती.
  Print


News - World | Posted : 2020-02-03


Related Photos