अर्जुनी मोर येथील तत्कालीन शाखा अभियंता अशोक राऊत व पत्नीविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल


- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्जुनी मोर. जि. गोंदिया येथील तत्कालीन शाखा अभियंता (वर्ग २) अशोक कचरुजी राऊत (५२) व त्याची पत्नी श्रीमती हंसलता अशोक राऊत रा. देवरी यांच्याविरुद्ध ३१ डिसेंबर २०१९ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीदरम्यान अशोक राऊत याने आपल्या लोकसेवक पदाच्या कार्यकाळात (२०/०८/१९९७ ते ३/१०/२०१७ पर्यंत) पदाचा गैरवापर करून भ्रष्ट मार्गाने पत्नी हंसलता अशोक राऊत यांच्या नावे ज्ञात उत्पन्नापेक्षा २७ लक्ष २० हजार ६७३ एवढी अपसंपदा धारण केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपी अशोक राऊत व त्यांची पत्नी हंसलता राऊत यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारयांनी ३१ डिसेंबर रोजी पोलिस स्टेशन देवरी जि. गोंदिया येथे अपराध क्रमांक २८१/१९ भादंवि कलम १३ (२) (ब), १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस हवालदार राजेश शेंद्रे, नाईक पोलिस शिपाई नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, गीता खोब्रागडे, देवानंद मारबते यांनी केली आहे.  Print


News - Gondia | Posted : 2019-12-31


Related Photos