महत्वाच्या बातम्या

 प्रत्येक खेळाडूला देणार ११ कोटींची कार भेट : प्रिन्स मोहम्मद बिन सलामन अल सौद यांची घोषणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये सौदी अरेबियाने पहिल्याच लढतीत बलाढ्य अर्जेंटिनाचा पराभव केला. या विजयाला चार दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरी सौदीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सौदीच्या अनेपेक्षित विजयामुळे तेथील सरकारही खुश झाले आणि एक दिवसाची सुट्टीही जाहीर केली. आता येथील राजाने सर्व खेळाडूंना महागडी गाडी भेट देण्याची घोषणा केली आहे.

अर्जेंटिना दुबळ्या सौदी अरेबियाची शिकार करणार असे वाटत होते, पण प्रत्यक्षात शिकारीचीच शिकार झाली. जागतिक क्रमवारीत 51 व्या स्थानावर असलेल्या सौदी अरेबियाने फिफा वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अर्जेंटिनाला 2-1 ने धक्का देत खळबळ माजवली. या विजयानंतर सरकारने दुसऱ्या दिवशी बुधवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. यानंतर सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलामन अल सौद यांनी संघातील प्रत्येक खेळाडूला 11 कोटी रुपयांची रोल्स रॉयस फॅंटम कार भेट देण्याची घोषणा केली आहे.

सौदी अरेबियाच्या फुटबॉल संघातील सर्व खेळाडूंना रोल्स रॉयस फॅंटम कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी घोषणा सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद यांनी जाहीर केले आहे. Rolls-Royce Phantom ची हिंदुस्थानातील किंमत 8.99 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 10.48 कोटी रुपयांपर्यंत जाते.

अर्जेंटिनाला गेल्या 36 सामन्यांत कुणी हरवू शकला नव्हता. यात त्यांनी 25 विजय मिळवले होते तर 11 सामने बरोबरीत सुटले होते. पण सौदी अरेबियाविरुद्धच्या पराभवाने ही मालिका खंडित झाली.





  Print






News - World




Related Photos