सोनिया, राहुल , प्रियांका गांधींचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध


- शिवसेनेची पुन्हा कोंडी होण्याची शक्यता 
वृत्तसंस्था / मुंबई :
विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तसेच काँग्रेस नेत्यांची बैठक सुरु होती. मात्र काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध दर्शविला असल्याची माहिती प्राप्त झाली असून यामुळे शिवसेनेच्या मानसुब्यांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.  
भाजपनं राज्यात सरकार स्थापन करण्यास नकार कळवल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्याचं निमंत्रण दिलं. आज संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत त्यांना सत्ता स्थापनेचा दावा करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेने आतापासूनच आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची वांद्र्याच्या हॉटेलमध्ये भेट घेतली. सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी विनंती  केली.   सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संध्याकाळी जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. काँग्रेसच्या भूमिकेनंतर आपण भूमिका जाहीर करू असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले होते. मात्र काँग्रेसची भूमिका शिवसेनेला पाठिंबा देण्याची नसून या घडामोडी नेमक्या कोणत्या पातळीवर जातील, सत्ता स्थापन होईल काय, की राष्ट्रपती राजवट लागू होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.    Print


News - World | Posted : 2019-11-11


Related Photos