महत्वाच्या बातम्या

 अवैद्य जुगार अड्‌डयावर धाड :  ७० हजार ७६० रु. चा माल जप्त


- ४ आरोपीवर कारवाई, ४ आरोपी फरार 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पोलीस स्टेशन नरखेड येथील अधिकारी व स्टॉफ हे पोलीस स्टेशन परीसरात पेट्रोलींग करीत असता ०५ मे २०२४ रोजी गोपनिय मुखबीर‌द्वारे माहीती मिळाली कि, नरखेड शेत टावून काही इसम ५२ तासपत्ताच्या जुगार खेळ खेळत आहे. 

अशा माहीतीवरून सदर ठिकाणी धाड टाकली असता घटनास्थळी आरोपी १) लवकेश ओमकार भुपती (२७) रा. वरूड जि. अमरावती २) ताहिर खान उनाउल्लाह खान (३१) रा. वरूड जि. अमरावती ३) परवेश किशोर बालपांडे (२४) रा. पांढुर्णा मध्यप्रदेश राज्य ४) कमलेश किशन उईके (३१) रा. धनोडी ता. वरुड जि. अमरावती ५) फरार आरोपी रत्नाकर तागडे रा. नरखेड ६) फरार आरोपी योगेश उईके रा. मालखेड नरखेड ७) फरार आरोपी योगेश आटनेरे रा. शनिवार पेठ वरूड जि. अमरावती ८) फरार आरोपी विनोद उर्फ शाहु सांभारे रा. जयस्तंभ चौक पांडुर्णा मध्यप्रदेश राज्य (फरार) असे घटनास्थळी ५२ तासपत्त्यांचा जुगार खेळ खेळतांनी मिळुन आले.  

१) एक व्हीवो व्ही २९ कंपनीचा मोबाईल फोन किमती २० हजार रू. २) सॅमसंग ए २३ कंपनीचा मोबाईल फोन किमती २० हजार रू. ३) ओपो ए ५५ कंपनीचा मोबाईल किमती फोन १० हजार रू. ४) ओपो ए २३ कंपनीचा मोबाईल फोन किमती २० हजार रू. ५) तासपत्ते कॅट ११ नग किमती ५५० रु. ६) नगदी ५५० रू. ७) हिरव्या रंगाची ताडपत्री किमती १०० रू. असा एकुण ७० हजार ७६० रू. चा माल जप्त करून ताब्यात घेतला.

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार (भापोसे) तसेच अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, अनिल मरके (भापोसे) सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सहा पोलीस निरीक्षक, प्रभारी ठाणेदार, राकेश साखरक,र पोलीस अंमलदार नितेश पुसाम यांचे पथकाने पार पाडली.





  Print






News - Nagpur




Related Photos