महाराष्ट्रात नवं सरकार नक्की स्थापन होईल आणि आम्ही त्याबाबत आश्वस्त आहोत : मुख्यमंत्री फडणवीस


वृत्तसंस्था / नवी दिल्ली : महाराष्ट्रात नवं सरकार नक्की स्थापन होईल आणि आम्ही त्याबाबत आश्वस्त आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्यासोबत आज दिल्लीत पार पडलेल्या  बैठकीनंतर आत्मविश्वासाने सांगितलं.
विधानसभा निवडणूक निकालानंतर पदं आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप करण्यात येईल, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या घोषणेवेळी पत्रकार परिषदेत केलं होतं. त्याचाच आधार घेत, शिवसेना अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद मागतेय. परंतु, पदं आणि जबाबदाऱ्या यामध्ये मुख्यमंत्रिपद येत नाही आणि मुख्यमंत्रिपदाच्या समसमान वाटपाचा शब्द आपण शिवसेनेला दिलेला नाही, यावर आज शाह - फडणवीस भेटीतही शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडून समजतं.     Print


News - World | Posted : 2019-11-04


Related Photos