महत्वाच्या बातम्या

 नगर परिषद विरोधात आमरण उपोषणाचा इशारा : पत्रकार राहुल गायकवाड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार मागितलेल्या माहितीची माहिती ३० एप्रिल पर्यंत न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा पत्रकार राहुल गायकवाड उपाध्यक्ष युवा ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा चंद्रपूर यांनी निवेदन द्वारे मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांना दिले आहे. 

माहितीचा अधिकार २००५ नुसार रितसर अर्ज तीन महिन्या अगोदर केले असून आता पर्यंत माहिती मिळाली नाही. यासाठी जबाबदार असलेले तत्कालीन अग्निशामक विभाग प्रमुख यांचे वर कारवाई तसेच नगर परिषद मध्ये मूळ पद असलेल्या चपराशी याला स्वास्थ्य विभाग व अग्निशामन विभाग या दोन विभागाचा प्रमुख म्हणून कार्यभार दिला आहे. तो रद्द करून त्याला मूळ पदावर कार्यरत करावे. अग्निशामन  स्वास्थ्य विभाग हे दोन्ही विभाग सरळ नागरिकाशी जुडले असून अश्या जोखीमेच्या ठिकाणी एका चपराशी ला विभाग प्रमुख बनविणे म्हणजे शहरवासीयांच्या जीवाशी खेळणे आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे.

या दोन प्रमुख मागण्या साठी १ मे ला सकाळी दहा वाजता पासून पत्रकार राहुल गायकवाड हे नगरपरिषद समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos