महत्वाच्या बातम्या

 बी. आय टी. अभियांत्रिकी अन्न तंत्रद्यान विभागा व्दारे अन्न भेसळ जागरूकता अभियान संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : अन्न तंत्रज्ञान विभाग, बल्लारपूर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी तर्फे अन्न भेसळ जागरूकता अभियानाचे आयोजन बि.आय. टि. चे डायरेक्टर डॉ. रजनिकांत मिश्रा, डिन डॉ. झेड.जे. खान, पदविका विभागाचे प्राचार्य एस. एस. गोजे, अन्न तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. प्रशांत वाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पब्लीक स्कूल येनबोडी, जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले.

अन्न भेसळ जागरूकता अभियान कार्यक्रमाला  बल्लारपूर पब्लीक स्कूल च्या प्राचार्या ज्योत्सना बाबुलकर , प्रा. मेघा शुक्ला, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. अर्नव जोशी यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या अन्न भेसळीचे प्रात्यक्षिक दाखवले तसेच अन्नातील काही सामान्य भेसळ शोधण्यासाठी साध्या चाचण्यांबाबत माहिती देण्याबरोबरच अन्नातील भेसळ आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. उदा. हे निदर्शनास आणून देण्यात आले, की अन्न भेसळ केल्यामुळे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतात.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रमास  पदविका प्रमुख प्रा. स्वागता कावळे, प्रा. के. एम. देव , प्रा. अजय दुर्गे, प्रा. लिलेश पुस्तोडे, प्रा. दिव्या कोरडे, प्रा. प्रियंका इरला, प्रा. सोनी ठाकुर, प्रा. साक्षी मिश्रा व कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अर्नव जोशी आदि मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.






  Print






News - Chandrapur




Related Photos