महत्वाच्या बातम्या

 संचालक रेशीम संचालनालय नागपूर यांची भंडारा जिल्ह्यातील रेशीम उद्योग केंद्रास भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी - भंडारा : भंडारा जिल्ह्यातील रेशीम उद्योग विकासाला चालना देण्याचे उद्देशाने २५ एप्रिल २०२४ रोजी श्रीमती वसूमना पंत भा. प्र.से. संचालक रेशीम संचालनाल नागपुर, अविष्यंत पांडा, भा. प्र. से. आयुक्त वस्त्रोद्योग विभाग, नागपुर तथा एम. बी. ढवळे, उपसंचालक रेशीम यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, भंडारा व जिल्ह्यातील प्रमुख रेशीम उद्योग केंद्रास भेट दिली. सदर प्रसंगी मान्यवरांनी मूलभूत सुविधा केंद्र, जमनी येथे भेट देऊन येथील रीलींग केंद्रातील स्त्री मजुरांशी संवाद साधला,तसेच शेतकरी प्रशिक्षण केंद्र आणि ग्रेनेज विभागाची पाहणी केली.

 व सुविधांची माहिती जाणून घेतली. व येथील सुविधा अधिक बळकट करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर भंडारा सिल्क उद्योग प्रायव्हेट लिमिटेड, मोहाडी येथील स्वयंचलित रीलींग कारखान्यास भेट देऊन त्याची पाहणी केली आणि उद्योग विस्तारबाबत चर्चा केली. आयुक्त यांनी भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध करवती साडी विणकर बांधवांना भेटी देऊन त्यांच्याशी चर्चा केली. व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

रेशीम विभागाद्वारे टेंडर च्या माध्यमातून वर्षभर सदर विणकर समुदायास रेशीम धागा पुरवठा व्हावा अशा सूचना दिल्या. जिल्ह्यात निर्मित टसर रेशीम कोषांपासून महिला बचत गटांच्या माध्यमातून धागा निर्मिती करण्याचे काम करून रोजगार निर्मिती करण्याच्या सूचना दिल्या. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता रेशीम विकास अधिकारी एम. आर. डिगुळे, व कार्यालयाचे ए. एम. ढोले, जे. बी. सरादे, पी.पी. बिजवे, प्रशांत गुरुमुखी व पीयूष भुजाडे यांनी परिश्रम घेतले. रेशीम विकास अधिकारी श्रेणी-2, जिल्हा रेशीम कार्यालय भंडारा यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos