महत्वाच्या बातम्या

 मनपा शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न


- आयुक्तांच्या हस्ते समर कॅम्पचे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांसाठी शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार चंद्रपूर महानगरपालिकेच्या पीएम श्री. सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा येथे इयत्ता १ ली साठी दाखलपात्र विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा क्र.१ उत्साहात पार पडला सोबतच समर कॅम्पचे उद्घाटन सुद्धा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत आपले मनोगत व्यक्त केले. महानगरपालिका शाळेत शिक्षणारा विद्यार्थी हा सामान्य कुंटूंबातील अवश्य आहे. मात्र मनपा शाळेत प्रवेश केल्यावर त्याला आपण उत्कृष्ट शाळेत शिकणार आहो अशी भावना निर्माण व्हावी हा मनपा प्रशासनाचा उद्देश आहे. या उद्देशपुर्तीसाठी शाळांमध्ये अधिकाधिक भौतिक सुविधा कश्या उपलब्ध करून देता येईल यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळांच्या वर्ग खोल्यांच्या आधुनिकीकरणाचे काम लवकर पूर्ण करून शाळेचे विविध कार्यक्रम घेणयासाठी एक उत्तम दर्जाचे सभागृह बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी इयत्ता पहिली दाखल पात्र विद्यार्थ्यांची बँड पथकासह रॅली काढण्यात येऊन सात स्टॉल वरून त्यांच्या विविध क्षमता तपासल्या गेल्या. उपस्थीत सर्वांनी समर कॅम्प मधील विविध खेळांचा आस्वाद घेतला, तसेच विशेष शाळा पूर्वतयारी सेल्फी पॉईंटचा आनंद घेतला. सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली बोढाले व आभार प्रदर्शन स्नेहा कुरतोटावार यांनी केले.

याप्रसंगी मुख्याध्यापक नागेश नीत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंदा बावणे, राधा चिंचोलकर, इतर सदस्य, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकगण उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos