महत्वाच्या बातम्या

 मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

 प्रतिनिधी / वर्धा : येत्या २६ एप्रिलला होणाऱ्या ०८ वर्धा लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे तसेच मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीप अंतर्गत सायकल रॅली काढण्यात आली.


मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुध्द राजुरवार, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, क्रीडा अधिकारी अनील निमगडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मतदारांनी आपल्या हक्काची जाणीव ठेवावी व लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा. युवा वर्गाने विशेषत: नवमतदारांनी जे प्रथमच मतदान करणार आहे त्यांनी उत्साहामध्ये मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


जिल्हा क्रिडा संकुल येथून सायकल रॅलीची सुरूवात झाली. महात्मा गांधी पुतळा, विश्रामगृह, आरती चौक, धूनिवाले मठ, आर्वी नाका, बॅचलर रोड, शास्त्री चौक, बजाज चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व जिल्हा क्रीडा संकुल येथे समारोप करण्यात आला. या सायकल रॅली प्रसंगी कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार अतुल रासपायले यांनी केले.





  Print






News - Wardha




Related Photos