महत्वाच्या बातम्या

 जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विशेष मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा जात पडताळणी समिती, वर्धा यांच्यामार्फत 25 एप्रिल 2024 पर्यंत समता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या समता पंधरवड्यात 12 वी विज्ञान शाखेतील सन 2023-24 मधील सर्व प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य एस.एम. चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हा जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर करतांना सर्वसामान्य विद्यार्थी, पालक, महाविद्यालयीन प्राध्यापक व प्राचार्य यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व प्रक्रियेची माहिती समता पंधरवड्यात देण्यात येणार आहे.

12 वी विज्ञान शाखेच्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांनी समितीकडे अर्ज सादर करावा. जेणेकरुन अर्ज तपासून वेळेत विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करुन देता येईल. तसेच अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा कागदपत्रे अपुरी असल्यास विद्यार्थ्यांनी समितीस प्रत्यक्ष भेट द्यावी.





  Print






News - Wardha




Related Photos