महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही येथे श्रीरामजन्मोत्सव थाटात साजरे 


- रामनामाच्या निनादाने आसंमतही दुमदुमले..

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही येथील श्रीराम मंदीरात श्रीराम नवमी उत्सव समिती सिंदेवाही-लोनवाही द्वारे आयोजित श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्या पासुन सुरु झालेला हा सोहळा १७ तारखेपर्यंत चालला. नवमीला सकाळच्या सुमारास भजनानि सुरवात झाली. श्रीरामप्रभू यांच्या दर्शनासाठी मंदीर परीसरामध्ये गर्दी केली होती. जन्मोत्सवानिमित्य श्रीरामाची मूर्ती, गाभारा, सभामंडप, आणि मंदीराचा परिसर फुलानी आणि विद्युत रोषनाईने सजविण्यात आला होता. १२ वाजता प्रभु श्रीरामाचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येऊन, प्रभु रामचंद्राच्या जीवनावर पाळणा, गौळणी, भारुड आदीचे गायन करण्यात येऊन प्रसाद वाटण्यात आला.

सायंकाळी ०५ वाजता शोभायात्रा श्रीराम मंदीरा पासुन, बाजार चौक, सिध्दार्थ चौक, आझाद चौक मार्गै राममंदीर या मार्गै शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत जयपुर वरूण खास बनवून आणलेली मुर्ती, श्रीराम, सितामाता प्रभू लक्ष्मन, हणूमानजी यांची झाकी, शाळकरी मुलींचे लेझीम पथक, यावेळी जय श्रीराम, श्रीरामचंद्र की जय अशा घोषणा देत तरुणाईने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. दुचाकी वाहनांवर भगवे झेंडे लावून सिंदेवाही शहराथ व परिसरातून तरुण कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली. 

यावेळी कार्यकर्त्यांनी भगवे ध्वज हातात घेऊन श्रीरामचंद्र की जय असा जयघोष केला. या शोभायात्रेत महीलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. डी.जे.च्या तालावर तरूणाई व महीला मंडळीनी ताल धरला होता. शोभायात्रे दरम्यान प्रभु रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, हनुमानजी, साईबाबा यांचे मोठ्या भक्तिभावाने भाविकांनी दर्शन घेतले. भजन पूजन, गोपालकाला व महाप्रसादाचे वाटप करून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम नवमी उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. 





  Print






News - Chandrapur




Related Photos