महत्वाच्या बातम्या

 निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाला सुरूवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : ०८ वर्धा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ एप्रिल २०२४ पासून टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान प्रक्रिया सुरू झाली असून ०८ वर्धा लोकसभा मतदार संघासाठी ४४३ व अन्य लोकसभा मतदार संघासाठी ४४२ असे एकूण ८८५ टपाली मतपत्रिका १५ एप्रिलला सुविधा केंद्रावरुन प्राप्त झाल्या आहेत.

निवडणूक काळात शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस कर्तव्य बजावत आहेत. मतदानापासून वंचित राहू नये म्हणून कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी व पोलिसांसाठी टपाली मतदानाची सोय करण्यात आली आहे. त्यानुसार मतदार संघनिहाय टपाली मतदानाची सोय केली आहे.

३६-धामणगाव विधानसभा मतदार संघात वर्धा लोकसभा मतदार संघासाठी १०३ व अन्य मतदार संघासाठी १४४ असे एकूण २४७ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. ४३-मोर्शी विधानसभा मतदार संघात वर्धा लोकसभा मतदार संघासाठी ०५ व अन्य मतदार संघासाठी १४९ असे एकूण १५४ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. ४४-आर्वी विधानसभा मतदार संघात वर्धा लोकसभा मतदार संघासाठी ३७ व अन्य मतदार संघासाठी २५ असे एकूण ६२ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.

४५- देवळी विधानसभा मतदार संघात वर्धा लोकसभा मतदार संघासाठी १८ व अन्य मतदार संघासाठी ३१ असे एकूण ४९ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. ४६-हिंगणघाट विधानसभा मतदार संघात वर्धा लोकसभा मतदार संघासाठी ६८ व अन्य मतदार संघासाठी २५ असे एकूण ९३ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. ४७-वर्धा विधानसभा मतदार संघात वर्धा लोकसभा मतदार संघासाठी २१२ व अन्य मतदार संघासाठी ६८ असे एकूण २८० टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.





  Print






News - Wardha




Related Photos