महत्वाच्या बातम्या

 चांदाफोर्ट देसाईंगंज-गोंदिया या रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाड्या सुरू होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / देसाईगंज : चांदाफोर्ट देसाईंगंज- गोंदिया या रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाड्या सुरू होण्यासोबतच सुपरफास्ट ट्रेन ला सुद्धा थांबा मिळणार आहे. यासाठी खासदार अशोक नेते यांनी संसदेत व केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे मागील दोन वर्षांपासून रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद होत्या. तसेच सुपरफास्ट ट्रेनला थांबा देण्याची मागणी केली जात होती. यामुळे चांटाफोर्ट देसाईगंज-गोंदिया या मार्गावरील प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. जिल्ह्यातील प्रवाशांची समस्या लक्षात घेता, खासदार अशोक नेते यांनी चांदाफोर्ट- देसाईगंज- गोंदिया या रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाड्या सुरु करण्यासह सुपरफास्ट ट्रेनला थांबा देण्याच्या मागणीकडे संसदेचे लक्ष वेधले होते. सोबतच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे सततचा पाठपुरावा सुरु होता.





  Print






News - Gadchiroli




Related Photos