महत्वाच्या बातम्या

 समाजकार्य महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सपेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित फुले- आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथे सांस्कृतिक विभागातर्फे १४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक भारत घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची समाजाला व विशेषतः शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणा मिळावी. यासाठी त्यांच्या कार्याशी संबंधित विषयावर परिसंवाद व अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

त्या प्रित्यर्थ महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे माळी माणिक माटे यांच्या भीम गीताने करण्यात आली. 

याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले प्राचार्य डॉ. सुरेश खंगार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ. दिलीप बारसागडे व प्रमुख पाहुणे डॉ. विनोद कुकडे  यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभाग सहप्रमुख डॉ. कविता ऊईके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. हितेश चरडे यांनी मानले.

याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, प्रशासकीय कर्मचारी, ग्रंथालयीन कर्मचारी तथा समस्त शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos