महत्वाच्या बातम्या

 उमेदवार व राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुसऱ्या टप्प्याची ईव्हीएमची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरित करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राची दुसरी सरमिसळ करणाची प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत व उमेदवार तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर पूर्ण करण्यात आली. यातून कोणते ईव्हीएम मशिन कोणत्या मतदान केंद्रावर जाणार हे निश्चित करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ईव्हीएम दुसऱ्या टप्प्याची सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीव्दारे पूर्ण करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत यांच्यासह उमेदवार तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगातर्फे विकसित संगणक प्रणालीव्दारे सरमिसळ प्रक्रिया करुन सर्व प्रकारच्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची नोंद घेवून लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या सहाही विधानसभा मतदार संघाच्या एकूण 1 हजार 997 मतदान केंद्रावर कोणते बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट जाणार हे निश्चित झाले आहे.

धामणगाव (रेल्वे) विधानसभा मतदार संघातील 378 मतदान केंद्रावर 756 बॅलेट युनिट, 378 कंट्रोल युनिट व 378 व्हीव्हीपॅट, मोर्शी विधानसभा मतदार संघातील 311 मतदान केंद्रावर 622 बॅलेट युनिट, 311 कंट्रोल युनिट व  311 व्हीव्हीपॅट, आर्वी विधानसभा मतदार संघातील 304 मतदान केंद्रावर 608 बॅलेट युनिट, 304 कंट्रोल युनिट व  304 व्हीव्हीपॅट, देवळी विधानसभा मतदार संघातील 332 मतदान केंद्रावर 664 बॅलेट युनिट, 332 कंट्रोल युनिट व 332 व्हीव्हीपॅट, हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील 341 मतदान केंद्रावर 682 बॅलेट युनिट, 341 कंट्रोल युनिट व 341 व्हीव्हीपॅट, वर्धा विधानसभा मतदार संघातील 331 मतदान केंद्रावर 662 बॅलेट युनिट, 331 कंट्रोल युनिट व 331 व्हीव्हीपॅट मशिन मतदान केंद्रावर जाणार हे निश्चित करण्यात आले.

तर दुसऱ्या सरमिसळ प्रक्रियेनंतर धामणगाव (रेल्वे) विधानसभा मतदार संघात 152 बॅलेट युनिट, 132 कंट्रोल युनिट व 170 व्हीव्हीपॅट, मोर्शी विधानसभा मतदार संघात 125 बॅलेट युनिट, 108 कंट्रोल युनिट व  139 व्हीव्हीपॅट, आर्वी विधानसभा मतदार संघात 112 बॅलेट युनिट, 76 कंट्रोल युनिट व 100 व्हीव्हीपॅट, देवळी विधानसभा मतदार संघात 123 बॅलेट युनिट, 83 कंट्रोल युनिट व 109 व्हीव्हीपॅट, हिंगणघाट विधानसभा मतदार संघात 126 बॅलेट युनिट, 85 कंट्रोल युनिट व 112 व्हीव्हीपॅट, वर्धा विधानसभा मतदार संघात 122 बॅलेट युनिट, 82 कंट्रोल युनिट व 109 व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos