महत्वाच्या बातम्या

 मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ०८ वर्धा लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल २०२४ रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. सर्वसाधारणपणे मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ३ एप्रिल २०२४ रोजीच्या अधिसूचनेद्वारे वर्धा लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

ही सार्वजनिक सुट्टी वर्धा लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच राज्य व केंद्र शासनाचे कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान यांना देखील लागू राहील, असे अधिसूचनेमध्ये नमुद करण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos