महत्वाच्या बातम्या

 मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकांनी बारकाईने लक्ष द्यावे : मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था


- सुक्ष्म निरीक्षकांना प्रशिक्षण

विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : निर्भय व मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची (मायक्रो ऑब्झर्वर) नियुक्ती भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावरील छोट्या, छोट्या गोष्टीवर सुक्ष्म निरीक्षकांनी बारकाईने लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था यांनी दिल्या.

सूक्ष्म निरीक्षकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत, नायब तहसीलदार अतुल रासपायले यांच्यासह चारही विधानसभा क्षेत्रातील सुक्ष्म निरीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मतदान प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर काहीही अडचण असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक निरीक्षकांना तात्काळ माहिती द्यावी, अशा सूचना कर्डिले यांनी यावेळी दिल्या.

या प्रशिक्षणामध्ये सुक्ष्म निरीक्षकांची जबाबदारी, कार्य, मतदान केंद्रावर उपस्थिती, मॉकपोलच्या वेळी उपस्थिती, कम्युनिकेशन प्लॅनची माहिती, मतदारांच्या बोटांना शाई बरोबर लावली जाते की नाही पाहणे, भेट नोंदवही, मतदान प्रक्रियेची गोपनियता बाळगणे, मतदान केंद्रांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान प्रक्रिया पार पडावी, याबाबत सूक्ष्म निरीक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.





  Print






News - Wardha




Related Photos