निवडणूक कर्तव्यावर पायी चालून जातांना भोवळ येऊन पडल्याने शिक्षकाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / एटापल्ली :
विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे, सकाळ पासूनच लोकशाहीचा उत्सवाला सुरवात झाली. अशातच ईव्हीएम मध्ये बिघाड अशा प्रकारच्या घटना समोर येत असताना गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बापू पांडु गावडे (४५) हे निवडणूक कर्तव्यावर पायी चालून जात असताना भोवळ येऊन पडले. त्यांचा चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बापू गावडे यांना मिरगीचा आजार होता. त्यांची विधानसभा निवडणूकीसाठी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील बुथवर ड्यूटी लागली होती. मतदान केंद्र पथक हेडरी बेस कॅम्पवरून पुरसलगोंदी केंद्राकडे पायी जात असताना गावडे हे भोवळ येऊन पडले. त्यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.
मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना प्रथम अहेरी व तेथून चंद्रपुर येथे हलवण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यापूर्वीही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या कर्तव्यावरील एक शिक्षकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-21


Related Photos