महत्वाच्या बातम्या

 वर्धा लोकसभा मतदार संघात २४ उमेदवार निवडणूक रिंगणात : २ उमेदवारांची माघार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : ०८ वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. २ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे वर्धा लोकसभा मतदार संघात एकूण २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

५ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या छाननीअंती २६ उमेदवार वैध ठरले होते. अग्रवाल शैलेश व माधुरी अरुणराव डहारे या दोन्ही अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात ३ राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार, १० नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार आणि ११ अपक्ष असे एकूण २४ उमेदवारांचा समावेश आहे.

निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार अमर शरदराव काळे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), डॉ. मोहन रामरावजी राईकवार (बहुजन समाज पार्टी), रामदास चंद्रभान तडस (भारतीय जनता पार्टी) यांचा समावेश आहे. तसेच नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार अक्षय मेहरे भारतीय (अखिल भारतीय परिवार पार्टी), आशिष लेखीराम इझनकर (विदर्भ राज्य आघाडी), उमेश सोमाजी वावरे (महाराष्ट्र विकास आघाडी), कृष्णा अन्नाजी कलोडे (हिंदराष्ट्र संघ), कृष्णा सुभाषराव फुलकरी (लोकस्वराज्य पार्टी), दिक्षीता आनंद ( देश जनहित पार्टी), मारोती गुलाबराव उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी), डॉ. मोरेश्वर रामजी नगराळे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया), प्रा. राजेंद्र गुलाबराव साळुंखे (वंचित बहुजन आघाडी), रामराव बाजीराव घोडसकर (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) यांचा समावेश आहे.

निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये इतर (अपक्ष) उमेदवार अनिल केशवरावजी घुशे, अरविंद शामराव लिल्लोरे, आसीफ, किशोर बाबा पवार, जगदीश उध्दवराव वानखडे, पुजा पंकज तडस, ॲड. भास्कर मारोतराव नेवारे, रमेश सिन्हा, राहुल तु. भोयर, विजय ज्ञानेश्वरराव श्रीराव, सुहास विठ्ठलराव ठाकरे यांचा समावेश आहे. २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos