विभागीय शालेय बाॅक्सिंग स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंनी पटकाविले ९ सुवर्ण, २ रौप्य पदक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर यांच्या वतीने नागपूर येथे आयोजित विभागीय शालेय बाॅक्सिंग स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत ९ सुवर्ण आणि २ रौप्य पदक पटकाविले आहे. 
१४ वर्ष वयोगटातील ३० - ३२ किलो वजनगटात देवांग दुधराम महागणकार, ३६ ते ३८ किलो वजनगटात रमेन रोशन मसराम तर २८ ते ३० किलो वजनगटात भावेश धनराज कोतकोंडावार याने रौप्य  व  १९ वर्ष वयोगटात ४६ ते ४९ वजन गटात प्रसाद रंजन टेप्पलवार यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे पदक पटकाविले आहे.
१७ वर्ष वयोगटातील मुलींच्या ४० ते ४२ किलो वजन गटात सारीका सुधाकर नैताम हिने रौप्य पदक पटकाविले. ४२ ते ४४ किलो वजन गटात कल्याणी दुधराम महागणकार, ५० ते ५२ किलो वजन गटात पौर्णिमा नरेंद्र सरकटे, ५७ ते ६० किलो वजन गटात शिवालिका रोहीत  विष्णोई, ६६ ते ७० किलो वजनगटात यशश्री चंद्रकांत साखरे व ७५ ते ८०  किलो वजनगटात मनस्वी मनोज काचिनवार या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकाविले आहे.
१९ वर्ष वयोगटातील ४६ ते ४९ या वजनगटात ऐश्वर्या मारोती झाडे हिने सुवर्ण पदक पटकाविले आहे. सर्व खेळाडूंची औरंगाबाद येथे होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 
हे सर्व खेळाडू गडचिरोली येथील बाॅक्सिंग केंद्रातील नियमित खेळाडू असून यशवंत कुरूडकर, महेश निलेकार, पंकज मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. 
खेळाडूंच्या यशाबद्दल  जिल्हा क्रीडा अधिकारी गांगरेड्डीवार, गडचिरोली बाॅक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जगदिश म्हस्के, मनोज देवकुले, नरेंद्र भरडकर, रंजन टेप्पलवार, सौरभ म्हशाखेत्री  आदींनी अभिनंदन केले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-19


Related Photos