महत्वाच्या बातम्या

 मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था यांनी घेतला वर्धा विधानसभा मतदारसंघाचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीला वेग आला असून ०४७- वर्धा विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या कामाचे नियोजन तसेच अंमलबजावणी संदर्भात आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय वर्धा कार्यालयास भेट दिली व निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला.

उपविभागीय अधिकारी यांचे कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांच्यासह वर्धेचे तहसीलदार संदीप पुंडेकर सेलुचे तहसीलदार स्वप्नील सोनवने तसेच विविध नोडल अधिकारी उपस्थित होते.

मुक्त व निर्भय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामूळे सर्वांनी आपसी समन्वयाने काम करावे. निवडणूक कामकजाविषयी काही अडचण असल्यास प्रत्यक्ष संपर्क साधावा असे, आवाहन ०८ वर्धा लोकसभा मतदार संघाचे मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था यांनी यावेळी केले.

४७ वर्धा विधानसभा मतदार संघात  लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ३२९ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून वर्धा विधानसभा मतदार संघात १ लाख ४१ हजार ९७ पुरुष व १ लाख ३८ हजार २७९ स्त्री आणि तृतीयपंथी १० असे एकूण २ लाख ७९ हजार ३९६ मतदार असून मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. या वर्षात ४  हजार ९३२ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. मय्यत, स्थालांतरीत असे २६१ मतदार मतदार यादीतुन वगळण्यात आले असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी यावेळी सांगितले.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार केंद्रावर सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या असून मतदान पथकांचे पहिले प्रशिक्षण सुध्दा २७ व २८ मार्च २०२४ रोजी घेण्यात आले आहे. दिव्यांग व ८५ वर्षावरील मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअर, वॉकरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेले मतदार तसेच ८५ वर्षावरील मतदारासांठी पोस्टल बॅलेटने मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे  बैठकीत सांगण्यात आले.

मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, बाईक रॅली, सायकल रॅली, मतदान शपथ तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंब प्रमुखाचे घोषणापत्र, राशनकार्ड व पेट्रोलपंधारक तसेच गॅस वितरक यांचे माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच निवडणूक कार्यक्रम अंमलबजावणी संदर्भात सर्व प्लॉन तयार करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीनंतर मुख्य निवडणूक निरीक्षक अभय नंदन अंबास्था यांनी निवडणूक कार्यालयातील निवडणुकीच्या कामासाठी स्थापीत एक खिडकी योजना, खर्च पथक व इतर सर्व विभागास भेट देवून नोडल अधिकारी यांचेकडून कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली व त्यांना मार्गदर्शन केले. जी.एस. कॉमर्स कॉलेज वर्धा येथील स्ट्रॉंग रुम, मतदान साहित्य वाटप व स्वीकार केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच वर्धा तालुक्यातील ४ मतदान केंद्राला भेट देऊन मतदान केंद्राच्या व्यवस्थेची तपासणी केली.





  Print






News - Wardha




Related Photos