महत्वाच्या बातम्या

 चंद्रपुरात संगीत सरिता चे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : शरयू आर्ट्स प्रोडक्शन व बॉडीलाईन जिम तर्फे ७ एप्रिल रोजी संगीत सरिता चे आयोजन करण्यात आले आहे.

७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता येथील प्रियदर्शिनी सभागृहात संगीत सरिता चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड. प्रशांत खजांची यांचे हस्ते ॲड वैशाली टोंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. डॉ. उषा खंडाळे, डॉ. सुवर्णा सोनडवले, डॉ. विजय गेडाम, श्रीकांत कासलीकर, जागृती फाटक, आशिष देव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सदर संगीत सरिता मध्ये गीत, नृत्य, मराठी रॅम्प, म्युच्युअल रॅम्प  राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक डॉ. शरयू पाझारे, डॉ. सुधाकर पाझारे, निखिल रत्तेवर, अंकुश मानकर, रिंकू घोष यांनी रसिक प्रेक्षकांना लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos