महत्वाच्या बातम्या

 ०८ वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : ०८ वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी ५ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या छाननीअंती २६ उमेदवार वैध ठरले आहेत. यात ३ राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार, १० नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार आणि १३ अपक्ष असे एकूण २६ उमेदवार वैध ठरले आहेत.

वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांमध्ये राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार अमर शरदराव काळे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), डॉ. मोहन रामरावजी राईकवार (बहुजन समाज पार्टी), रामदास चंद्रभान तडस (भारतीय जनता पार्टी) यांचा समावेश आहे. तसेच वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांमध्ये नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार अक्षय मेहरे भारतीय (अखील भारतीय परिवार पार्टी), आशिष लेखीराम इझनकर (विदर्भ राज्य आघाडी), उमेश सोमाजी वावरे (महाराष्ट्र विकास आघाडी), कृष्णा अन्नाजी कलोडे (हिंदराष्ट्र संघ), कृष्णा सुभाषराव फुलकरी (लोकस्वराज्य पार्टी), दिक्षीता आनंद ( देश जनहित पार्टी), मारोती गुलाबराव उईके (गोंडवाणा गणतंत्र पार्टी), डॉ. मोरेश्वर रामजी नगराळे (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया), प्रा. राजेंद्र गुलाबराव साळुंखे (वंचित बहुजन आघाडी), रामराव बाजीराव घोडसकर (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक) यांचा समावेश आहे.

वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांमध्ये इतर (अपक्ष) उमेदवार अग्रवाल शैलेश, अनिल केशवरावजी घुशे, अरविंद शामराव लिल्लोरे, आसीफ, किशोर बाबा पवार, जगदीश उध्दवराव वानखडे, पुजा पंकज तडस, ॲड. भास्कर मारोतराव नेवारे, माधुरी अरुणराव डहारे, रमेश सिन्हा, राहुल तु. भोयर, विजय ज्ञानेश्वरराव श्रीराव, सुहास विठ्ठलराव ठाकरे यांचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम ८ एप्रिल २०२४ आहे. २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून ४ जून २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos