महत्वाच्या बातम्या

 नागपुरात ४८.३ : राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : राज्यात सूर्य आग ओकत असून नागरिकांना असह्य उन्हाळ्याला सामोरे जावे लागत आहे. हवामान विभाग व पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दिलेल्या दिवसाच्या हवामान सारांशात आज नागपूर शहरात ४८.३ एवढ्या कमाल तापमानाचा अंदाज देण्यात आला असून हे राज्यातील सर्वाधिक तापमान आहे.

राज्यात उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज नुकताच हवामान विभागाने दिला असताना राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४५° पर्यंत जाऊन पोहोचल्याचे चित्र आहे. आज नागपूर शहरात ४१ ते ४८.३° पर्यंत तापमान गेल्याचे दिसून येत आहे. त्या खालोखाल अकोला ४४.७, जळगाव ४४.८, धाराशिव, सोलापूर, वर्धा ४३, नाशिक ४२ अंशांवर पोहोचले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos