महत्वाच्या बातम्या

 नवोदय प्रवेश परीक्षेत कुनघाडा (रै.) जि.प. कन्या शाळेतील ५ विद्यार्थिनींची गरुडझेप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षेच्या निकालात जिल्हा परिषद उच्च प्रा. कन्या शाळा कुनघाडा (रै.) पंचायत समिती चामोर्शी च्या विद्यार्थिनींनी सलग ४ च्या यशस्वी हॅट्रिक नंतर यावर्षी ५ विद्यार्थिनींनी नवोदय विद्यालयात प्रवेश निश्चित केलेला आहे. 

अक्षरा विजय दूधबावरे, आराध्या प्रवेश मेश्राम, खुशी नीलकंठ टिकले, समृद्धी रवींद्र कुनघाडकर, क्रिष्टी श्रीनिवास बंडमवार यांनी २०१९ पासून नव्या जोमाने आणि नव्या जोशाने सुरू झालेली यशाची परंपरा या वर्षीही कायम ठेवला. 

मागील सलग चार वर्ष चार विद्यार्थिनींची हॅटट्रिक आणि या वर्षी आपलाच विक्रम मोडून ५ विद्यार्थिनींची निवड झालेली आहें. 

यश मिळवणे सोपे असते पण ते यश टिकवून ठेवणे कठीण असते सत्राच्या सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी ज्यादा सराव नवोदयचे जादा वर्ग, रात्र कालीन वर्ग, पहाटे च्या गृहभेटी, पुरक मार्गदर्शन, प्रत्येक आठवड्यात चाचणी, प्रत्येक आठवड्यात सराव परीक्षा, विविध शैक्षणिक व्हिडिओ, माता पालकांचे मार्गदर्शनपर सत्र, घरोघरी रात्रीच्या गृहभेटी इत्यादी उपक्रमामुळेच हे यश प्राप्त झालेले आहे.

२०१९ ते आजपर्यंत अश्या एकूण ५ शैक्षणिक सत्रात एकूण १८ मुलींची यशाला गवसणी -

सन २०२२-२३- १) गायत्री महावीर गव्हारे, २) मनीषा सुरेश वासेकर,३) धनश्री  रामचंद्र काटवे, ४) संस्कृती हंसराज दुधे सन २०२१-२२ - १) संस्कृती गणेश दुधबळे, २) उन्नती देवानंद बांबोळे, ३) पौर्णिमा नामदेव नैताम, ४) गोजिरी  जगन्नाथ चौधरी सन २०२०-२१ - १) अपूर्वा संतोष गव्हारे २) ज्ञानी किशोर कुकडे ३) अंशीता संतोष वडेट्टीवार ४) विशाखा विजय कुकडे सन २०१९-२० - १) पूजा सूर्यभान वाघाडे यांनी स्थान पटकावले होते. 

यावेळी सुद्धा शाळेने यशाची परंपरा कायम राखत आपले ५ स्थान निश्चित केले आहेत.

या यशाचे श्रेय विद्यार्थिनींनी वर्गशिक्षक निमाई मंडल, रोशन बागडे, गौतम गेडाम, मुख्याध्यापक- गोटामी, वर्षा गौरकर, रेखा हटनागर, प्रीती नवघडे, विलास मेश्राम यांना दिले आहे.

गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के, केंद्रप्रमुख गोमासे आणि संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीने मुलींच्या या यशाचे भरभरून कौतुक केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos