महत्वाच्या बातम्या

 चोख पोलीस बंदोबस्तात इव्हीएम चारही विधानसभेच्या स्ट्रॉंगरुममध्ये रवाना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची पुर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरित करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राची पहिल्या टप्प्यातील सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर पूर्ण करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील सरमिसळ झालेल्या इव्हीएम वर्धा येथील मुख्य स्ट्राँगरुममधून ३ मार्च ला चोख पोलीस बंदोबस्तात जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभेच्या स्ट्रॉंगरुममध्ये रवाना झाले.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑन कॅमेरा ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली. जीपीएस यंत्राची सुविधा असणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या महाकार्गो बसेसव्दारे आर्वी विधानसभा मतदार संघासाठी बॅलेट युनिट -३८० कंट्रोल युनिट -३८० व व्हीव्हीपॅट-४०४, देवळी विधानसभा मतदार संघासाठी बॅलेट युनिट-४१५ कंट्रोल युनिट-४१५ व व्हीव्हीपॅट -४४१, हिंगणघाट विधानसभा मतदार संघासाठी बॅलेट युनिट-४२६ कंट्रोल युनिट-४२६ व व्हीव्हीपॅट -४५३ व वर्धा विधानसभा मतदार संघासाठी बॅलेट युनिट-४१३ कंट्रोल युनिट-४१३ व व्हीव्हीपॅट -४४० मशिन वाटप करण्यात आले.

यानंतर विधानसभा मतदार क्षेत्रातील कोणत्या मतदान केंद्रावर कोणते मतदान यंत्र जाईल हे निश्चित करण्यासाठी मतदान यंत्राच्या सरमिसळीची प्रक्रिया पुन्हा पार पडणार आहे, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos