महत्वाच्या बातम्या

 खर्च निरीक्षक श्रीधर दास यांची विरुळ येथील चेकपोस्टला भेट व पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : उमेदवार व पक्षाकडून होणाऱ्या दैनदिन खर्च विषयक बाबींचे निरीक्षण करण्यासाठी खर्च निरीक्षक म्हणून श्रीधर दास यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. यांच्याकडे धामणगाव (रेल्वे), मोर्शी व आर्वी या विधानसभा मतदार संघाची जबाबदारी दिली आहे. त्याअनुषंगाने खर्च निरीक्षक श्रीधर दास यांनी विरुळ येथील स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी) चेकपोस्टला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी सहाय्यक खर्च निरीक्षक रवींद्र जोगी, तहसीलदार हरीश काळे, पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे, राहुल सोनवणे उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला आणि राजकीय पक्षाला खर्चाची मर्यादा दिली आहे. त्याचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे यासाठी खर्च निरीक्षक दास यांनी ४४ -आर्वी विधानसभा मतदारसंघ मुख्यालय येथे भेट देऊन निवडणूक खर्च विषयक व पथकांच्या कामाचा आढावा घेतला.

स्थायी निगराणी पथकामार्फत नियमित व्हिडिओ रेकॉर्डींग होणे आवश्यक आहे. रोख व मद्य पकडणे या घटनेची व्हिडिओ रेकॉर्डींग आवश्यक असून प्रत्येक घटनाक्रमाचा पुरावा गोळा करण्यात यावा. रोख पकडल्याची घटना निदर्शनास आल्यास या घटनेची माहिती तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक खर्च निरीक्षक व आयकर खात्याला द्यावी, अशा सूचना त्यांनी भेटीदरम्यान दिल्या.





  Print






News - Wardha




Related Photos