महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२९ मार्च महत्वाच्या घटना

१८४९ : ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

१८५७ : बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.

१९३० : प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९६८ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.

१९७३ : व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.

१९८२ : एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

२०१४ : इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.

१९४२ : क्रिप्स योजना जाहीर

२९ मार्च जन्म

१८६९ : दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९४४)

१९१८ : वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९२)

१९२६ : अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च २०१०)

१९२९ : रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९३)

१९३० : मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म.

१९४३ : इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर यांचा जन्म.

१९४८ : साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म.

२९ मार्च मृत्यू

१५५२ : शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५०४)

१९६४ : इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी यांचे निधन.

१९७१ : बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८६)

१९९७ : सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९१५)





  Print






News - todayspecialdays




Related Photos