महत्वाच्या बातम्या

 निवडणूक कामाचे प्रशिक्षण


- देसाईगंज प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दुष्टिने निर्वाचन विभाग सज्ज झाला असून निवडणुकीच्या दुष्टिने कर्मचाऱ्यानां प्रशिक्षण दिले जात आहे. देसाईगंज येथील नगर परिषद सांस्कृतिक भवनात पहिल्या टप्यातील प्रशिक्षण कर्माच्याऱ्यानां देण्यात आले.

प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने व्हिव्हिपॉट, बॅलेट  यूनिट, कंट्रोल यूनिट आदींची महिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. निवडणुकीच्या कामावर कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यानां मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी मतदार यादीत आपला अनुक्रमांक यादीतील भाग क्रमांक याविषयी कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी यादीमध्ये सदर माहिती शोधली. तसेच निवडणूक प्रक्रियेविषयक सविस्तर माहिती घेऊन प्रक्रिया व्यवस्थित व वेळेत पार पडावी यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.

या प्रशिक्षणाप्रसंगी देसाईगंज विभाग  कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos