महत्वाच्या बातम्या

 गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या तर्फे माजी अध्यक्षा स्नेहादेवी आत्राम यांना पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गोंडवाना सैनिकी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गडचिरोली येथे भगवंतराव मेमोरील शिक्षण संस्था अहेरी, चे माजी अध्यक्षा स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्य २७ मार्च रोजी विद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजीव गोसावी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे, प्रा. संदीप कोटांगले, प्रा. काशिनाथ भोंगाडे, ज्येष्ठ शिक्षक शाहिद शेख, रहीम पटेल व संतोष बोबाटे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला विद्यालयातील समस्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.  





  Print






News - Gadchiroli




Related Photos