महत्वाच्या बातम्या

 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पुर्वतयारीला वेग आला असून निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी प्राधान्याने करावयाच्या बाबी, मतदान यंत्रे हाताळणीबाबत तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी सर्व यंत्रे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे. मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर मॉकपोल घेणे. मतदान कार्यपद्धती, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कसे हाताळावे, मतदानाच्या दिवशी मतदारांसाठी सुलभता व्हावी तसेच मतदान प्रक्रियेवेळी कोणतीही अडचण येऊ नये व यंत्र हाताळणीचा अधिकाधिक सराव व्हावा, यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

वर्धा येथील चरखागृह व जी. एस कॉलेज वर्धा येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, यावेळी उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसीलदार आणि आर्वी येथील गांधी विद्यालय व रोशन सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, तहसीलदार, विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

देवळी येथील भोंग सभागृह व जनता विद्यालय येथे आयोजित प्रशिक्षणास उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, तहसीलदार आणि हिंगणघाट येथील बिडकर कॉलेज येथे आयोजित प्रशिक्षणात उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनोले, तहसीलदार, विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.





  Print






News - Wardha




Related Photos