महत्वाच्या बातम्या

 राणीच्या बागेत ४७ प्राण्यांचा मृत्यू : अहवालातून धक्कादायक माहिती समोर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : अनेकांचा हृदयविकाराच्या झटाकमुळे मृत्यू झाल्याचे ऐकले असेल. पण एखाद्या प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू होतो असे कधी ऐकले का तुम्ही? पण असाच काहीसा प्रकार भायखळा येथील राणीबागे घडला आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहलयातील ४७ प्राणी आणि पक्ष्यांच्या गेल्या वर्षभरात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये तब्बल ३० प्राण्यांचा ह्रदयविकारामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

देशभरातील प्राणिसंग्रहायलयातील पक्षी आणि प्राणी यांच्याबाबतचा अहवाल नुकताच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्रसिद्ध केला आहे. यामध्ये २०२२-२३ या वार्षिक अहवालात कोणत्या प्राण्यांच कोणत्या आजारामुळे झाला याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये हृदयाचा झटका, श्वसनक्रिया बंद होणे आणि अनेक अवयव निकामी होणे यांसारख्या विविध आजारांना बळी पडत असल्याची माहिती या अहवालातून देण्यात आली आहे.

या आजारांमुळे मृत्यू -

१ एप्रिल २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या वर्षात राणीच्या बागेतील ४७ प्राणी, पक्ष्यांच्या विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये ३० प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहीती वार्षिक अहवालातून समोर आली आहे. प्राणी संग्रहालयातील पेंग्विन, वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, विविध पक्षी आहेत.

तसेच एप्रिल २०२२ ते एप्रिल २०२३ या वर्षात ४७ प्राण्यांचा मृत्यू झाला असून त्यात ठिपके असलेले हरीण, इमू, मॅकाक रीसस, सांबर, आफ्रिकन पोपट, कासव यांचा समावेश आहे. यातील ३० प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला.

या पक्षांचा मृत्यू -

राणीबागेतील ज्या पशू आणि पक्ष्यांचा मृत्यू झाला, त्यामध्ये पोपट आफ्रिकन ग्रे, कॉकॅटियल बडेरिगर, सांबर हरण, बडेरिगर, मॅकॉ मिलिटरी, तीतर गोल्डन, भारतीय फ्लॅपशेल, कासव, गोल्डन जॅकल, इमू इत्यादी पक्षी आणि प्राण्यांचा समावेश आहे. वृद्धापकाळाने सर्वात कमी मृत्यू झाले आहेत. मात्र सर्वाधिक प्राण्यांचा मृत्यू या कारणांमुळे का होत आहे याची कारणमीमांसा अद्याप झालेली नाही.

याआधी २०१९- २० या वर्षात वीर जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात तब्बल ३२ विविध प्रकारच्या प्राण्यांचा मृत्यू झाला होता. या अहवालाच पक्षी, सस्तन प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा लेखाजोखा मांडण्यात आला. त्यानुसार वर्षभरात ८ पक्षी, १७ सस्तन प्राणी आणि ३० सरपटणाऱ्या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते.





  Print






News - World




Related Photos