आज होणार लढतीचे चित्र स्पष्ट, अहेरीत काँग्रेस - राकाँ , गडचिरोलीत काँग्रेस - शेकापच्या निर्णयांकडे लक्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आज ७ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून आज लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. आजच उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात  काँग्रेस - राकॉ मध्ये आघाडी असतांनाही काँग्रेस आणि राकॉ ने वेगवेगळे उमेदवार उभे केले आहेत. यामुळे घोळ निर्माण झाला आहे तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आघाडीमध्ये असलेल्या शेकाप ने आपला उमेदवार उभा केल्याने घोळ निर्माण झाला आहे. यामुळे दोन्ही पक्ष समजोता करून कोणी उमेदवार मागे घेतो की उमेदवारी कायम ठेवतो याकडे  तसेच किती अपक्ष आपली उमेदवारी मागे घेतात याकडे  जनतेचे लक्ष लागले आहे. 
 जिल्हयातील एकुण ४७ पैकी ४४ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तर ३ उमेदवारांचे अर्ज  अपात्र ठरले आहेत.  अहेरी विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीसाठी ४  ऑक्टोबर पर्यंत भरण्यात आलेल्या नामनिर्देशन अर्जा मधुन १० उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैद्य ठरले आहेत. यामध्ये  दीपक मललाजी आत्राम-INC,  धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम-NCP,  अम्ब्रीशराव राजे आत्राम सत्यवानराव-भाजपा,  लालसू सोमा नागोटी-वंचित बहूजन आघाडी,  मधुकर यशवंत सडमेक-BSP, नागेश लक्षण तोर्रेम-पिसंटस ॲन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, अजय मालय्या आत्राम-अपक्ष, कैलास गणपत कोरेत-अपक्ष,  दिनेश ईश्वरशाह मडावी-अपक्ष,  संदीप मारोती कोरेत-अपक्ष यांचे नामांकन अर्ज वैद्य ठरले आहे. तर अपात्र मध्ये भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम, भारती वसंत इस्टाम व  सतिश हनमंतु मडावी यांचे अर्जांचा समावेश आहे.

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील  १७ उमेदवारांचे नामांकन अर्ज पात्र
 शरद यादवराव सोनकुसरे- अपक्ष,  निलेश छगनलाल कोडापे-अपक्ष, दुधकुवर नानाजी गोपाळा-अपक्ष, निताराम झिंगरराव कुमरे- अपक्ष , बगुजी केवळराम ताडाम-अपक्ष , अनिल पुंडलिक कुमरे-अपक्ष , वामन वंगणुजी सावसाकडे-अपक्ष, ८.रमेश गोविंदा मानागडे-अपक्ष , सुरेंद्रसिंह बजरंगसिंह चंदेल-अपक्ष, कृष्णा दामाजी गजबे - भाजपा, आनंदराव गंगाराम गेडाम - INC , रमेश लालसाय कोरचा – वंचित बहूजन आघाडी , मुकेश सोगुराम नरोटे- विदर्भ राज्य आघाडी, मनेश्वर मारोती मडावी-अपक्ष, कवळु लक्ष्मण सहारे-अपक्ष, दिलीप परचाके – कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, बाळकृष्ण सडमाके-बसपा यांचे सर्व पात्र अर्ज आहेत.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील १७ उमेदवारांचे नामांकन अर्ज पात्र
 मन्साराम माधव आत्राम-अपक्ष, डॉ.चंदा नितीन कोडवते-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, देवराव मादगुजी होळी - भाजप , संतोष नामदेव मडावी - अपक्ष, शिवाजी आडकु नरोटे- अपक्ष, संतोष दशरथ सोयाम-अपक्ष,  जयश्री विजय वेळदा-पिंझटस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडीया , केशरी बाजीराव कुमरे- अपक्ष , गुलाबराव गणपत मडावी- अपक्ष , दिवाकर गुलाब पेंदाम - अपक्ष, अक्षमलाल पाललाल सिडाम-बहूजन समाज पार्टी, ममीता तुळशीराम हिचामी- गोंडवाना गणतंत्र पार्टी, सतिश भैयाजी कुसराम- आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडीया , सागर भरत कुंभरे- अपक्ष , गोपाल काशिनाथ मगरे-वंचित बहूजन आघाडी, चांगदास तुळशीराम  मसरम-अपक्ष ,  दिलीप किसन मडावी- संभाजी ब्रीगेड पार्टी यांचे सर्व पात्र अर्ज आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-07


Related Photos