महत्वाच्या बातम्या

 उच्चशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमाचे १६ मार्चला आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व मानव अधिकार संरक्षण मंच यांचे संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर, नागपूर येथे १६ मार्च, २०२४ ला सकाळी १० ते १२ पर्यंत करण्यात येणार आहे.

बारावी नंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, कोणती शाखा आपल्यासाठी योग्य राहील यासारख्या अनेक बाबींची समस्या विद्यार्थ्यांसमोर असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे याकरीता उच्चशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामध्ये केंद्रिय विद्यापीठ जेएनयु, एचसीयु, बीबीएयु, जेऐएमआयए अभिमत विद्यापीठ टीआयएसएस, एपीयु, आरजीएनआयवायडी येथे उच्च शिक्षणाची संधी कशा प्रकारे प्राप्त होऊ शकते त्याचप्रमाणे बारावी नंतर सीयुईटी (युजी) कॉमन यनिवर्सिटी एनट्रन्स टेस्ट (अनडर ग्राज्युऐट) एक विशेष पर्याय यावर दिल्ली विश्वविद्यापीठाचे संशोधक तथा मानव अधिकार संरक्षण मंचचे सदस्य आकाश संजय खोब्रागडे हे मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे व मानव अधिकार संरक्षण मंचचे सचिव आशिष फुलझेले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. जास्तीत संख्येने विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos