महत्वाच्या बातम्या

 प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र व्यतिरिक्त जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लू नाही : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र येथील कोंबड्यांची मरतुक एव्हियन इन्फ्ल्युएन्झा (बर्ड फ्लू) मुळे झाल्याचे आढळून आल्याने घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. या रोगाचा प्रादूर्भाव व प्रसार टाळण्यासाठी प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र नागपूरच्या एक किलोमीटर त्रिजेतील सर्व कुक्कुट पक्षी यांना शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आले आहे. 

प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र, नागपूर वगळता जिल्ह्यातील अन्य कोणत्याही भागात पक्षांमध्ये मरतूक आढळून आलेली नाही व नोंदही झालेली नाही. इतर भागातील असलेल्या पक्षांना ही बाधा झालेली नसल्याने इतर क्षेत्रातील कोंबडीचे मास व अंडी योग्यरित्या शिजवून सेवन करण्यास हरकत नाही. याचबरोबर आरोग्याला कुठल्याही प्रकारचा यातून धोका उद्भवणार नाही असे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी सांगितले. केवळ इतर भागात या रोगाचा प्रादूर्भाव पसरु नये यादृष्टीकोणातून तातडीने योग्य त्या खबरदारीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचे डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.





  Print






News - Nagpur




Related Photos