बापरे ! भ्रष्ट अधिकाऱ्याच्या घरातून २ लाख कोटींची रोकड , १३ टन सोने जप्त


वृत्तसंस्था / बीजिंग :   भ्रष्टाचार थांबविण्यासाठी जगभरात विविध  उपाय केले जात आहेत.  परंतु त्यावर पूर्ण नियंत्रण मिळवणे अशक्य असल्याचे ताजे उदाहरण चीनमध्ये समोर आले आहे. एका भ्रष्टाचारी अधिकाऱ्याच्या घरातून   तब्बल २ लाख कोटी रुपयांची रोकड आणि अंदाजे ३०० मिलियन डॉलर किमतीचे  १३ टन सोने  जप्त करण्यात आले आहे.
चीनमधील कम्यूनिस्ट अधिकाऱ्यावर लाचखोरीचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप होता. झांग की असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या अधिकाऱ्याच्या घरावर याच महिन्यामध्ये पोलिसांनी छापा टाकला. या छापेमारीत पोलिसांना अनेक संशयित गोष्टी आढळून आल्या. पोलिसांनी अधिकाऱ्याच्या घरातून २ लाख ६२ हजार कोटी रुपयांची रोकड आणि १३.५ टन सोने जप्त केले आहे. या छापेमारीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाल्याने या व्हिडीओवर बंदी घालण्यात आली आहे.
झांग की  हैनात प्रोविन्समध्ये प्रमुख पदावर होते. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर त्यांना पदावरून पायउतार करण्यात आले होते. विशेष म्हणजे ते ज्या आलिषान घरामध्ये राहात होते ते घर देखील त्यांनी लाच म्हणून घेतले असावे असा संशय पोलिसांना आहे. झांग की यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर चीनचे सर्वात श्रीमंत व्यक्ती जॅम मा यांच्यापेक्षा अधिक संपत्ती बाळगणारे व्यक्ती म्हणून त्यांनी नोंद होईल. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
  Print


News - World | Posted : 2019-10-02


Related Photos