महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


७ मार्च महत्वाच्या घटना

१८७६ : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले.

१९३६ : दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्‍हाईनलँडमधे सैन्य घुसवले.

२००६ : लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.

२००९ : केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.

७ मार्च जन्म

१७६५ : फोटोग्राफी चे शोधक निसेफोरे नाऐप्से यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै १८३३)

१७९२ : ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १८७१)

१८४९ : महान वनस्पतीतज्ञ ल्यूथर बरबँक यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल १९२६)

१९११ : ज्ञानपीठ पुरस्कार विजिते आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिराचंद वात्सायन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८७ – नवी दिल्ली)

१९१८ : मराठी साहित्यिक स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचा जन्म.

१९३४ : भारताचा यष्टिरक्षक नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा जन्म.

१९४२ : भारतीय क्रिकेटपटू उमेश कुलकर्णी यांचा जन्म.

१९५२ : वेस्ट इंडियन क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्डस यांचा जन्म.

१९५५ : चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांचा जन्म.

७ मार्च मृत्यू

१६४७ : छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचे निधन.

१९२२ : रंगभूमी नट गणपतराव जोशी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १८६७)

१९५२ : तत्वज्ञ परमहंस योगानंद यांचे निधन.

१९६१ : भारतरत्न पंडित गोविंदवल्लभ पंत यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १८८७)

१९७४ : माजी अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी यांचे निधन.

१९९३ : माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९००)

२००० : कथालेखक प्रा. प्रभाकर तामणे यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)

२०१२ : संगीतकार रवि शंकर शर्मा ऊर्फ रवि यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९२६)

२०१५ : भारतीय वकील आणि राजकारणी जी. कार्तिकेयन यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १९४९)





  Print






News - todayspecialdays




Related Photos